Share

भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : परदेशातील सेलिब्रेटिंनी आपल्या देशातील शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देत पाठिंबा दर्शवल्यानंतर त्याविरोधात भारतातील सेलिब्रेटिंनी भारत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना भारतातील सेलिब्रेटिंना आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यानंतर आपल्या भूमिका मांडा, असा सल्ला दिला आहे.

शेतकऱ्याच्या बाजूने काही मोजके सेलिब्रेटी सोडले तर यातील एका तरी सेलिब्रेटी उभा राहिला आहे का? सर्वात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि मग आपल्या काय भूमिका मांडायच्या आहेत त्या मांडा. या आंदोलनाला जगभरातील लोकांचाही पाठिंबा मिळत आहे. पण देशातील काही प्रमुख लोक त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत, कारण ते भीती आणि दहशतीखाली आहेत आणि ते शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत. असे मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

या मुद्यावर राऊत म्हणाले, "देशाचे आंदोलन सेलिब्रेटींवर चालत नाही. शेतकरी आंदोलनासाठी थंडी, पावसासारख्या परिस्थितीत गाझीपूर सीमेवर बसले आहेत. या सेलिब्रेटिंनी त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केली आहे का? देशातीाल जे सेलिब्रेटी ट्विटरवरुन आज बोलत आहेत, त्यांना भाजपाने एका लक्झरी बसमध्ये बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरवर नेले पाहिजे आणि हजारो शेतकरी कोणत्या परिस्थितीत तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, आणि कसे राहत आहेत, हे दाखवायला पाहिजे." असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!