🕒 1 min read
मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. या ट्विटसोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही सचिनने वापरले आहेत. त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेल्या ट्विटर वॉरवर आता इतरही सेलिब्रिटी मैदानात उतरुन आपलं मत मांडत आहेत. मात्र, यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी टीका केली आहे.
रविकांत तुपकर ट्विट करून म्हणाले, ‘राष्ट्रध्वजाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. देशाची एकता टिकली पाहिजे या मताचे आपण सर्वच आहोत. पण गेल्या ७० दिवसांपासून हाडे गोठविणाऱ्या थंडीत शेतकरी आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते? आणि एकाच दिवशी सर्व सेलिब्रिटीना कशी काय जाग येते? केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनाचा मार्ग काढायचा नाही, तर ते मोडून काढायचे आहे. वेळोवेळी विविध मार्गानी कटकारस्थान रचले जात आहे. आता क्रिकेटपटू, बॉलीवूड मंडळीच्या माध्यमातून#hashtag चालवून, नवीन Propaganda सेट केला जात आहे.’
आणि एकाच दिवशी सर्व सेलिब्रिटीना कशी काय जाग येते?
केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनाचा मार्ग काढायचा नाही, तर ते मोडून काढायचे आहे. वेळोवेळी विविध मार्गानी कटकारस्थान रचले जात आहे. आता क्रिकेटपटू, बॉलीवूड मंडळीच्या माध्यमातून #hashtag चालवून, नवीन Propaganda सेट केला जात आहे.— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) February 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले खिळे शेतकऱ्यांनी उपसले!
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
