🕒 1 min read
मुंबई:- सध्या देशात पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने, शिवसेना ५ तारखेला राज्यभर मोर्चे काढणार आहे.
दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला आहे. शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली आहे.
शिवसेनेवर टीका केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती आहे त्यामध्ये राज्याचा काहीही संबंध नाही. देशातल्या आणि राज्यातल्या लोकांनी जर केंद्र सरकारने उद्या पेट्रोल १०० रुपये लीटर केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नये. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी फडणवीसांनी हे वक्तव्य केलं असावं, अशा प्रकारचे प्रतिउत्तर अजित पवार यांनी फडणवीस यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले खिळे शेतकऱ्यांनी उपसले!
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
