🕒 1 min read
वॉशिंग्टन: कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे. त्याच बरोबर लता मंगेशकर यांनी देखील यावर ट्वीट केले आहे.
दरम्यान विदेशातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत असताना मात्र अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारत सरकारच्या तीनही नव्या कृषी कायद्यांना समर्थन केल आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन करत, कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे.
यानंतर अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि व्यवसायाने वकिल असलेल्या मीना हॅरिस यांनींही शेतकरी आंदोलनावर टि्वट केले आहे. मात्र त्यांनी कृषी कायद्यांना नाही तर शेतकऱ्यांना दिला आहे.
जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एका महिन्यांपूर्वी हल्ला झाला. आता जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशावर हल्ला होत आहे. हा काही योगायोग नाही. इंटरनेट शटडाऊन आणि भारतातील शेतकऱ्यांवर होणारा हिंसाचार पाहून आपल्याला संताप आला पाहिजे. याविरोधात आवाज उठवायला हवा, असे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली’
- भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
