🕒 1 min read
कोल्हापूर : महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अधिकचा ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे इतर राज्यातून ऑक्सिजनची मदत मिळत आहे. तर, राज्य सरकारने देखील ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, अशातच कानडी सरकारने महाराष्ट्राचा प्राणवायू पुरवठा रोखला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज कर्नाटक सरकारने अचानकपणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारीमधून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरु होता. पण कर्नाटक सरकारने तो आज बंद केला आहे.
यावर आता केंद्र सरकारने पुढाकार करून हा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. ‘सध्या तरी यात राजकारण वाटत नाही. मात्र, केंद्राने लवकरात लवकर हस्तक्षेप करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा,’ असं सतेज पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘बंगालमध्ये सर्वांना तत्काळ मोफत लस द्या’, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र
- पाकिस्तानला चपराक! काश्मीरप्रश्नी भारत-पाकने चर्चेतून तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्राचे आवाहन
- बंगाल हिंसाचाराचा निषेध अंगलट, बीडमध्ये प्रवीण दरेकरांवर गुन्हा
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये ममता समर्थकांकडून केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला


