🕒 1 min read
मुंबई : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. नुकतेच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन देखील समोर आले आहे.
२७ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता पाच दिवस झाले आहेत. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका स्वतः प्रवीण तरडे यांनी केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. याबाबत प्रवीण तरडे यांनी एक पोस्ट केली आहे, पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “फक्तं तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास. फक्तं आणि फक्तं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे. असाच लोभ असुद्या. सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा.”
यासोबतच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन झाले आहे हे देखील प्रवीण तरडे यांनी सांगितले. या चित्रपटाने पहिल्या तिन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली आहे. पुढील काही दिवसातच हा चित्रपट १५ कोटींची कमाई करेल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
