Share

Salman Rushdie stabbed : लेखक सलमान रश्दी यांच्यावर भर कार्यक्रमात जिवघेणा चाकू हल्ला, हल्लेखोरांना अटक!

Published On: 

🕒 1 min read

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमादरम्यान इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी एका व्यक्तीने हल्ला केला. मुंबईत जन्मलेले आणि बुकर पारितोषिक विजेते रश्दी (75) हे पश्चिम न्यूयॉर्कमधील चौटौका इन्स्टिट्यूटमधील एका कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान सुरू करणार होते. तेव्हा एका व्यक्तीने स्टेजवर येऊन रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. रश्दी यांच्या मानेला दुखापत झाली आहे. उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडले आणि नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. रश्दी यांच्यावर स्टेजवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

न्यूयॉर्क पोलिसांनी लेखक सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा तपास करत असल्याचे निवेदन जारी केले आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितले की, “12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता, एक संशयित रश्दी आणि त्याची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी स्टेजवर चढला. रश्दी यांच्या मानेवर वार करण्यात आला आहे. संशयित हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. रश्दी यांच्या मानेला दुखापत झाली आहे. रश्दी यांना हेलिकॉप्टरने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचवेळी त्यांची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. चौटौका काउंटी शेरीफ कार्यालयाची एक टीम घटनास्थळी आहे.”

रश्दींच्या वादग्रस्त पुस्तकावर इराणमध्ये बंदी –

रश्दींच्या “द सॅटॅनिक व्हर्सेस” या वादग्रस्त पुस्तकावर इराणमध्ये 1988 पासून बंदी घालण्यात आली आहे. या पुस्तकातून रश्दींनी धर्मनिंदा केली आहे, असे अनेक मुस्लिमांचे मत आहे. याबाबत इराणचे तत्कालीन सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्लाह खामेनी यांनी रश्दी यांना फाशीची शिक्षा देण्याचा फतवा काढला होता. इराणने रश्दीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला तीस लाख डॉलरहून अधिक बक्षीसही देऊ केले होते.त्या पुस्तकासाठी त्यांना प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार जाहीर झाला होता.

‘द बुकर प्राईज’ने केला हल्ल्याचा निषेध-

‘द बुकर प्राईज’ने रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. दिल्लीस्थित ब्रिटिश लेखक विल्यम डॅलरिम्पल यांनी रश्दी यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांना दुखापत झाली नसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सलमान रश्दीची पहिली कादंबरी 1975 मध्ये आली होती, परंतु आधुनिक भारताबद्दलचे त्यांचे मुख्य काम मिडनाइट्स चिल्ड्रन (1981) आहे. द सॅटॅनिक व्हर्सेस (1988) या त्यांच्या चौथ्या पुस्तकावरील वादानंतर ते बराच काळ लोकांच्या नजरेपासून दूर राहिले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!