Share

भाजपच्या ‘त्या’ आरोपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

मुंबई : त्रिपुराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात काही भागात पडले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे २१ नोव्हें. रोजी अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी अमरावतीमध्ये हिंसाचार झालेल्या भागाची फडणवीसांनी पाहणी केली. तसेच या दौऱ्यात त्यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आरोप केले. यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करीत आहेत, असा आरोप केला. अशीच कारवाई होत राहिली तर भाजपचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता.

यावर संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे, ‘भाजपाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असं नाही. तसा आरोप करणं चुकीचं आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली, ज्यांनी अमरावतीच्या जनतेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं ते कुणीही असू द्या कायदा त्यांच्यावर कारवाई करेन. एका पक्षाचे आहेत म्हणून ते हिंदू किंवा मुस्लीम आहेत हे चालणार नाही.’ असे स्पष्ट राऊतांनी यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ‘एखाद्या पक्षाचे लोक दंगलीत सहभागी आहेत तर ते एका गटाचे नसतात ते दंगलखोर असतात. रझा अकादमीवर बंदीचा विचार केला जात आहे. सरकार, गृहमंत्री त्यावर निर्णय घेतील. भाजपाने आपली आक्रमकता दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी दाखवू नये, तर शांतता निर्माण करण्यासाठी दाखवावी. कोणी कोणत्याही पक्षाचा असु द्या असं करणं योग्य नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे,’ असं संजय राऊत यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!