मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत टोला लगावला आहे. अमरावती घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांनी रझा (Raza akadami)अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadanvis)त्यांच्या काळात बंदी का घातली नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. झा अकादमीवर बंदी घालण्याबाबत गृहमंत्री,कॅबिनेट आणि मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील. असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्रात अमरावतीसारख्या (Amravati)घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे. विदर्भात पुढे 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राज्य सरकारनं अमरावतीमधील परिस्थिती आटोक्यात आणली. आज अमरावती शांतता नांदत आहे. भाजप कशासाठी आंदोलन करतंय त्यांना पुन्हा अमरावती पेटवायची आहे का? कशा करता आंदोलन करताय, जे काही होईल ते कायद्यानं होईल. महागाईवर भाजप आंदोलन करतंय का? चीन लडाखमध्ये घुसलंय म्हणून आंदोलन करतय का? इंटेलिजन्स गाझीपूर बॉर्डरवर फेल होतं. अरुणाचल प्रदेशात इंटेलिजलन्स फेल होतं. माणसं आहेत चुका होतात. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लय भारी!! पुण्याचे महापौर ठरले देशातील सर्वाधिक लोकप्रिय
- ‘नियमांचे बडगे फक्त राजकीय विरोधकांना, बाकी सगळ्यांना मोकळे रान’, राऊतांचे टीकास्त्र
- शरद पवारांनंतर आता चंद्रकांत पाटलांचे पावसात भाषण
- ‘मविआ एसटी कर्मचाऱ्यांविरोधात दंड थोपटतंय हा पुरुषार्थ नाही’
- खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा- संजय राऊत
- मराठी साहित्याशी संबंध नसलेल्या जावेद अख्तरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचे औचित्य काय? भाजपचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

