मुंबई: मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी राज्यातील इंटलिजन्स अपयशी ठरलं होतं. त्यामुळे अमरावतीमध्ये मोर्चा कसा निघाला (Amravati Violence) हे माहिती नाही, असं म्हटलं होत.आता यावरच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारनं अमरावतीमधील परिस्थिती आटोक्यात आणली. आज अमरावती शांतता नांदत आहे. भाजप कशासाठी आंदोलन करतंय त्यांना पुन्हा अमरावती पेटवायची आहे का? कशा करता आंदोलन करताय, जे काही होईल ते कायद्यानं होईल. महागाईवर भाजप आंदोलन करतंय का? चीन लडाखमध्ये घुसलंय म्हणून आंदोलन करतय का? इंटेलिजन्स गाझीपूर बॉर्डरवर फेल होतं. अरुणाचल प्रदेशात इंटेलिजलन्स फेल होतं. माणसं आहेत चुका होतात. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
तसेच भाजपला परत दंगल करायची आहे का? भाजप आंदोलन कशासाठी करत आहे. देशातील महागाई की चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली त्याबाबत भाजप आंदोलन करत आहे? असा सवालही करत अमरावती शांत झाली असताना कोणीही येऊन उगाचच काड्या करण्याचं काम करू नये, असंही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- लय भारी!! पुण्याचे महापौर ठरले देशातील सर्वाधिक लोकप्रिय
- ‘नियमांचे बडगे फक्त राजकीय विरोधकांना, बाकी सगळ्यांना मोकळे रान’, राऊतांचे टीकास्त्र
- शरद पवारांनंतर आता चंद्रकांत पाटलांचे पावसात भाषण
- ‘मविआ एसटी कर्मचाऱ्यांविरोधात दंड थोपटतंय हा पुरुषार्थ नाही’
- खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा- संजय राऊत
- मराठी साहित्याशी संबंध नसलेल्या जावेद अख्तरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचे औचित्य काय? भाजपचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

