मुंबई : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या समस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे.
मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘वर्षभर आधी हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. मानवतावादी सरकार शेतकऱ्यांचा बळी जाताना उघड्या डोळ्यांनी पाहत होतं’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका आधीपासूनच आडमुठेपणाची होती. सरकारनं याआधी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. आंदोलकांना दहशतवादी, खलिस्तानी म्हटलं. आंदोलनात दहशतवादी घुसलेत म्हणण्यापर्यंतही केंद्र सरकारची मजल गेली. शेतकरी अन्नदाता आहे. या देशाचा आत्मा आहे, याचा विसर सरकारला पडला. पण अखेर सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं, असं राऊत म्हणाले.
शेतकरी आंदोलनाला ठाम राहिले. या काळात 450 हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं गेलं. हरियाणात शेतकऱ्यांवर लाठीमार झाला. मात्र त्या परिस्थितीतही शेतकरी मागे हटला नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला. पुढल्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडणुकीत फटका बसेल या भीतीनं तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असावा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शेतकरी महान आहेत त्यांनी मोदींना झुकायला लावलं- नवाब मलिक
- ‘आंदोलन मागे घेतले जाणार नाही, जोपर्यंत..’, टिकैत यांचा मोदींना इशारा
- पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

