नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. मात्र यावर भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी या निर्णयाला आव्हान दिले आहे.
मोदींनी तीन कृषी कायदे रद्द केले मात्र शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत. जोपर्यंत कृषी कायद्यांना संसदेत रद्द केले जाणार नाही. आम्ही या दिवसाची वाट पाहणार आहोत. सरकारने MSP सोबतच शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी, अशी मागणी राकेश टिकैत यांनी ट्वीट करत केली आहे. त्यामुळे टिकैत यांनी मोदींच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
आंदोलन तत्काल वापस नहीं होगा, हम उस दिन का इंतजार करेंगे जब कृषि कानूनों को संसद में रद्द किया जाएगा ।
सरकार MSP के साथ-साथ किसानों के दूसरे मुद्दों पर भी बातचीत करें : @RakeshTikaitBKU#FarmersProtest
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) November 19, 2021
दरम्यान केंद्रातील भाजप सरकारने घाईघाईने लादलेल्या तीन कृषी कायद्यांत किमान हमी भावाची तरतूदच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावाने विकला जाऊन यातून फायदा व्यापाऱ्यांचा होणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या अशा बाजार समित्यांच्या अस्तित्वावरही घाला येणार आहे.कंत्राटी शेतीमुळे नवीन जमीनदारी पद्धतीला चालना मिळण्याचा धोका अधिक आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. हे शेतकरी व्यापारी व उद्योगपतींच्या समोर तग धरू शकणार नाहीत. शेतकरी भांडवलदारांच्या हातचा गुलाम बनेल. यातून शेती व शेतकरी देशोधडीला लागण्याचा धोका मोठा आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे फक्त शेतकऱ्यांचेच नुकसान होणार नाही तर साठेबाजीला मोकळे रान मिळाल्यामुळे महागाई वाढून सामान्य लोकांना त्याचा फटका बसणार आहे. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- लड़ने को तुम और भाषण को हम- संजय राऊत


