मुंबई : एसटी कामगारांच्या संपावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’सरकार एस. टी . कर्मचाऱ्यांची फिकीर करीत असल्याने आतापर्यंत संयमाने पावले टाकण्यात आली . एस . टी . महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणे तूर्तास शक्य नाही हे विरोधी पक्षालाही पक्के माहीत आहे . कामगारांनीही हे सत्य स्वीकारले आहे , पण भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी झाली . १२ आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एस . टी . कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे . दहशत , ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे . त्यात एस . टी . कर्मचाऱ्यांनी स्वतःचे नुकसान करून घेऊ नये , एवढीच अपेक्षा.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’एस .टी. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर चर्चा वगैरे होऊन इतरही प्रश्न भविष्यात मार्गी लागतील. तरीही भारतीय जनता पक्षातले लोक संपास चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. साताऱ्यात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. सातारा आगारातून एस.टी. बस बाहेर काढणाऱ्या चालकांना भाजप समर्थकांनी हाणामारी केली. अशा घटना आता अन्य ठिकाणी घडू लागल्या आहेत. हे भाजपचे वैफल्य म्हणायला हवे. मुंबईतील आझाद मैदानावर एस.टी. कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या ठिय्या आंदोलनात भाजपचे नेते घुसतात व शेवटपर्यंत लढण्याच्या गर्जना करून आपापल्या घरी आरामात झोपतात. कर्मचारी मात्र तेथे मच्छर, दगडधोंडय़ांच्या सहवासात बसून आहेत. त्या ठिय्या आंदोलनात भाजपनेही सात-आठ दिवस पथारी पसरलीय असे दिसत नाही. म्हणजे ‘लड़ने को तुम और भाषण को हम’ असेच त्यांचे चालले आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- मुस्लिम आरक्षणाबाबत ओवेसींनी ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी
- ‘ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथेच…’; अनिल बोडेंचं खळबळजनक वक्तव्य
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा अल्टीमेटम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

