Share

Shivsena VS BJP : शिवसेनेच्या अस्थिरतेमागे संजय राऊतांचा हाथ?; ‘भाजप’चा व्यंगचित्रातून प्रहार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या सर्व घडत असलेल्या राजकीय सत्तानाट्यामागे व शिवसेनेच्या अस्थिरतेमागे संजय राऊत हात असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. या पाश्वर्भूमीवर भाजपने पुन्हा एकदा व्यंगचित्रातून राऊतांवर प्रहार केला आहे.

“संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता कोणत्याही पक्षाला मिळू नये, संजय राऊत यांनी शिवसेनेचे मित्र संपवले”, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. दरम्यान भाजपने ट्विट केलेल्या व्यंगचित्रातून ‘शिवसेनेच्या अस्थिरतेमागे संजय राऊतांचा हाथ?’, असा सवाल उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरे झोपले आहेत व संजय राऊत तलवार घेऊन बाजूला बसले असताना या व्यंगचित्रात दिसून येत आहे.

बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता –

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तसेच आता या बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव देण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!