Share

Sanjay Raut VS MNS : “बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर…”, संजय राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.   एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल्याचे बोलले जात असले तरी, यामुळे शिंदे यांनी मनसेशी गाठ बांधण्याच्या दृष्टीने चर्चा केली असल्याच्या चर्चा राजकारणात रंगत आहेत. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत मनसेवर निशाणा साधला आहे.

“बंडखोर आमदार AIMIM, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे बंडखोरीमागील कारण स्पष्ट केले आहे. “मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!