मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. आलियाने चाहत्यांसाठी एक सुखद धक्का दिला आहे. आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘आमचं बाळ…लवकरचं येत आहे’.
आलियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर देखील दिसत आहे. फोटोमध्ये आलिया खूप आनंदी दिसत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी आलिया आणि रणबीर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर सेलिब्रेटी सुद्धा कमेंट करत आहेत.
https://www.instagram.com/p/CfS-_HvMhQ8/
रणबीर कपूरची बहीण रिधिमा कपूर , आलियाची आई त्याचबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय यांसारख्या कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी लग्न केले होते. यांचे लग्न मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या ‘वास्तू’ बंगल्यावर झाले होते. रणबीर-आलियाने साधेपणानं केलेल्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या :


