Share

‘संजय राऊतजी, शिवसेनेच्या रॅलींतून कोरोना पसरत नाही का?’, मंत्री कपिल पाटलांचा पलटवार

Published On: 

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागात जनतेशी संवाद साधण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याकरिता महाराष्ट्रात भाजपाच्या वतीने जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आल्या आहेत. या यात्रांना गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

‘जनआशीर्वीद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. ज्याप्रकारे या गर्दीचे नियंत्रण आहे. लोकांना एकत्र करताय हे तिसऱ्या लाटेचे आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही तुम्ही हे करताय, म्हणजे मुद्दामहूनच. मात्र, किमान संयम पाळा’, असेही राऊत यांनी म्हटले होते.

राऊत यांच्या या टीकेला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत रॅली आणि कार्यक्रमांना गर्दी होते. तेव्हा कोरोना पसरत नाही का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ते कल्याणमध्ये बोलत होते. मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा आज बुधवारी कल्याणमध्ये दाखल झाली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, ‘कोरोनाचे सर्व नियम पाळून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेना नेते आणि युवा नेत्यांच्या कार्यक्रमात मास्कही लावलेला नसतो. तिथे प्रचंड गर्दी असते. याचा अर्थ सरकार पुरस्कृत शिवसेनेच्या रॅलींमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यातील कार्यक्रमात ५ ते १० हजार नागरिक जमा होता. तिथे कोरोना होत नाही. भारतीय जनता पक्षाने काही केले तर लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते?, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!