मुंबई : आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः राजभवनावर गेले होते. त्यांच्या सोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष सुरूच आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विट करून राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, संजय राऊतांनी शुभेच्छा देताना रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्यांवरून राज्यपालांना चिमटा देखील काढला आहे. ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील. जय महाराष्ट्र!’ असं चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त
गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील.
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2021
दरम्यान, विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्या बेबनाव असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता तरी राज्यपाल या नियुक्त्या करणार का ? हे पाहण्यासारख आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारमध्ये चाललंय काय ? भुजबळ -राऊत झाले आक्रमक,भाजपला होणार फायदा ?
- ‘हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका’
- नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल
- ‘अरे हा तर फारूख शेख’ ; हिमेशचा जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
- डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सिराज का इशांत ? ; सचिनने दिले ‘हे’ उत्तर


