मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना थेट आव्हान दिले आहे. किरीट सोमय्या म्हणाले, “शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतप्रकरणी मी काही घोटाळा केल्याचा संशय असेल तर आरोप करण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुरावे द्यावे. उगीच या प्रकरणात टाइमपास करून वेळ वाया घालवू नये”. या प्रकरणी सध्या शिवसेना आणि भाजपमधील राजकारण तापले असल्याचे दिसत आहे.
संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर आरोप केले. म्हणाले, आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले. कोट्यवधी रुपये जमा केले, त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणांनी या घोटाळ्याची चौकशी करावी. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे.
किरीट सोमय्यांनी संजय राऊतांच्या आरोपाला जोरदार उत्तर दिले. म्हणाले, ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. मी काही केले असेल, तर त्याचे पुरावे संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. पण त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू इच्छितात. असा जोरदार टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला
“ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…” मनसेने राऊतांना डिवचले
“सलीमचा भोंगा बंद लवकरच जावेदचाही…”, मोहित कंबोज यांचा राऊतांवर निशाणा
“हर हर ईडी, घर घर ईडी”, सामनातून संजय राऊतांचा प्रहार
“मी डोलकर दर्याचा राजा…”, पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये सचिन तेंडुलकरने धरला मराठी गाण्यावर ठेका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

