🕒 1 min read
मुंबई: बँगलोर आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूच्या नेत्रदीपक विजयानंतर सामन्याचा हिरो दिनेश कार्तिकला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. शेवटच्या सामन्यातही जेव्हा RCB संघर्ष करत होता तेव्हा त्याने फिनिशरची चमकदार भूमिका बजावली निभावली होती. त्याने पुन्हा आरसीबीसाठी संकटमोचन म्हणून येऊन संघाला विजय मिळवून दिला आहे.
दिनेश कार्तिकने (dinesh kartik) अवघ्या २३ चेंडूत धुव्वादार ४४ धावांची खेळी केली. ज्याने आरसीबीला आरामात विजय मिळवून दिला. सोबतच तो सलग तिसऱ्या सामन्यात नाबाद राहिला आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाल्यानंतर दिनेश म्हणाला, मी सतत स्वतःला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. मला असेही वाटते की गेल्या काही वर्षांत मी आणखी चांगले करू शकलो असतो. यासाठी मी खूप सराव केला आहे. मी सुद्धा स्वतःला सांगितले की मी अजून संपलेलो नाही.”
राजस्थानच्या १७० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीची मध्यम फळी सुरुवातीलाच ढासळली. त्यानंतर शादाब आणि रूदरफोर्डने आरसीबीची खेळी पुढे नेली. रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने येऊन आपल्या तळपत्या बॅटने शानदार फटकेबाजी करत आरसीबीला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला
- “ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…” मनसेने राऊतांना डिवचले
- “सलीमचा भोंगा बंद लवकरच जावेदचाही…”, मोहित कंबोज यांचा राऊतांवर निशाणा
- “हर हर ईडी, घर घर ईडी”, सामनातून संजय राऊतांचा प्रहार
- “मी डोलकर दर्याचा राजा…”, पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये सचिन तेंडुलकरने धरला मराठी गाण्यावर ठेका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
