Share

IPL 2022 CSK vs DC : ऋषभ पंतचे ‘कडक’ शॉट पाहून गर्लफ्रेंड झाली खूश..! स्टेडियममधील VIDEO व्हायरल!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लीगच्या ५५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) मोठा विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतची कथित गर्लफ्रेंड इशा नेगी उपस्थित होती. या सामन्यात पंतने मैदानात येताच काही चांगले फटके मारले पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. पंतने ११ चेंडूत २१ धावा केल्या आणि ४ चौकार मारले.
इशा नेगील दिल्ली कॅपिटल्स संघाला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली होती. डावाच्या पाचव्या षटकात डेव्हिड वॉर्नरला महिश थिक्षनाने बाद केल्यावर पंत फलंदाजीला आला. पंतने थिक्षनाच्या एकाच षटकात लागोपाठ ३ चौकार मारले. यादरम्यान, पंतच्या फटक्यांवर इशा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसली.

व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेल्या इशाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी सर्वांसमोर आपले नाते समोर आणले नसले तरी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/addicric/status/1523344355980849153

असा रंगला चेन्नई-दिल्ली सामना…

आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ५५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिमाखदार पद्धतीने दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) विजय मिळवला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ९१ धावांनी मात दिली. डेव्हॉन कॉनवे-ऋतुराज गायकवाड यांची शतकी सलामी आणि धोनीच्या फिनिशिंग धावांच्या जोरावर टॉस गमावलेल्या चेन्नईने दिल्लीसमोर २०८ धावांचा डोंगर उभारला होता. कॉनवेने ८७ धावांची खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रत्युत्तरात दिल्लीचे स्टार फलंदाज आव्हान पेलू शकले नाहीत. १७.४ षटकात ११७ धावांवर पंतसेना ऑलआऊट झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!