बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे. कर्नाटक हद्दीतील अनेक गावांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा आहे. मराठी भाषिकांची संख्या अधिक असलेल्या गावांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. त्यांची कुंचबणा करून धमकावलं जातं, असे अनेक प्रकार समोर आले आहेत.
मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचं मतदान होणार आहे. या जागेसाठी मराठी भाषिक एकवटले असून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके या युवकाने शड्डू ठोकला आहे.
सध्या सोशल मीडियामध्ये देखील शुभम शेळके यांची चर्चा असून त्यांची काही भाषणे देखील व्हायरल होत आहे. यामुळे, काँग्रेससह भाजपला देखील ही पोटनिवडणूक जड जाणार असून शिवसेनेनं शुभम शेळकेंना पाठींबा जाहीर केला आहे. दरम्यान, आता या तरुणाच्या प्रचारार्थ शिवसेना नेते व खासदार संजय राऊत थेट कर्नाटक गाठणार आहेत.
***शुभम शेळके * https://t.co/1Z76qTetdk
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 12, 2021
शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या १४ एप्रिलला बेळगावत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी जाणार आहेत. याबाबत स्वत: संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. बेळगाव मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. शुभम शेळके यांनी या भागात मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी, सीमाभागप्रश्नी वेळोवेळी आवाज उठवला आहे. यामुळे त्यांना मराठी भाषिकांचे अधिक मत खेचून आणण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- टाळ्या-थाळ्या खूप झाल्या, आता व्हॅक्सिन द्या : राहुल गांधी
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- रमजान साजरा करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सूट द्या : राष्ट्रवादी
- सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण; फडणवीसांच्या विधानाने खळबळ
- भाजपच्या लसोत्सवात अपुऱ्या लसींचा अडथळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

