पंढरपूर : २०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत हातमिळवणी केली. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली असून सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. हे तीन भिन्न विचारांचं सरकार असून फार काळ टिकणार नाही असं भाकीत अनेकदा भाजप नेत्यांनी केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सभेत भाषण करताना पुन्हा एकदा सत्तापालटावर सूचक विधान केलं आहे. ‘केवळ एका मतदारसंघाची निवडणूक आहे, याने काय फरक पडणार आहे ? याने काय सरकार बदलतंय का ? असे सवाल केले जात आहेत. सरकार कधी बदलायच ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण. तुम्ही समाधान आवताडेंना विजयी करा, तिकडे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असं विधान फडणवीसांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुढचे पंधरा दिवस महत्वाचे, जाणून घ्या अजित पवारांचा ऍक्शन प्लॅन !
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- लॉकडाऊन अटळ : आता गरिबांना मदत कशी करता येईल याविषयी चर्चा सुरु
- लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘पृथ्वीराज चव्हाण वैफल्यग्रस्त, मोदींवर ओढून-ताणून टीका’, भाजपचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

