औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद यांच्या नेतृत्वात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची जालन्यात नुकतीच भेट घेऊन येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्या संदर्भातील समस्या व तरावीह नमाजबाबत चर्चा करण्यात आली.
रमजान महीन्याचे इस्लाम धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. हा महिना वर्षातून एकदाच येत असतो. त्यामुळे या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव रोजा, पाच वेळ नमाज व्यतिरिक्त तरावीहची विशेष नमाज पठण करतात. शिवाय महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. कडक लॉकडाऊन पण लागण्याची शक्यता आहे. कोविड-१९ रूग्णांमध्ये रोज वाढ होत असल्याने एक दोन दिवसात चोवीस तास लाॅकडाऊनचे आदेश निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ऐन रमजान महिन्यात लाॅकडाऊन लावल्यावर काही समस्या उद्भवू शकतात. तसेच रमजान महिन्यात इफ्तार फळे खरेदीसाठी मुस्लिम बांधव बाजारात जातात. तसेच विशेष नमाज पठण करण्यासाठी मस्जिद मध्ये जातात. लाॅकडाऊन असल्याने ह्या सर्व बाबतीत समस्या निर्माण होणार असल्याने यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी विस्तारपूर्वक चर्चा करण्यात आली.
विशेष नमाज अदा करण्यासाठी रात्री ८ ते १० या दोन तासासाठी लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात चर्चा करतांना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद, माजी शहर कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, बादशहा पटेल इत्यादींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी
- रुग्णांना सर्रासपणे सीटी स्कॅन करायला भाग पाडू नका, केंद्रीय पथकाच्या सूचना
- लॉकडाऊन अटळ : आता गरिबांना मदत कशी करता येईल याविषयी चर्चा सुरु
- ‘ठाकरे सरकारने काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही’
- गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारची नियमावली जाहीर !


