Share

टाळ्या-थाळ्या खूप झाल्या, आता व्हॅक्सिन द्या : राहुल गांधी

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

कोरोन महामारीची हीच गंभीर परिस्थिती संपूर्ण देशावर आलेली आहे. भारतात एका दिवसाला सुमारे दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

३८५ दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. ‘कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे दिल्लीत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांचे चांगले सहकार्य मिळाले आणि रुग्णालयातील स्थिती नियंत्रणात राहिली तर लॉकडाऊनची गरज पडणार नाही. पण स्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊन लावावा लागेल,’ असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!