Share

भाजपच्या लसोत्सवात अपुऱ्या लसींचा अडथळा

Published On: 

औरंगाबाद : शहरात अत्यंत वेगाने पसरणार्‍या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सर्वांत प्रभावी उपाययोजना आहे. याचमुळे शहरात लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. भाजपने देखील लसीकरण उत्सवाला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या आठवड्यात शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता.

शहराला ५० हजार लसींचा साठा शहराला मिळणार होता. मात्र आज (दि.१२) केवळ ३० हजार लसींचा साठा मनपाला प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. कमी प्रमाणात आलेल्या लसींमुळे भाजपच्या लसीकरण उत्सवावर विरजण पडते कि काय अशी चर्चा सुरु आहे.

शहरात १६ जानेवारी पासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून आजवर पहिल्या टप्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसर्‍या टप्यात फ्रंटलाईन वर्कर आणि तिसर्‍या टप्यात ६० वर्षांवरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र ज्यांना गंभीर आजार आहेत अशा लाभार्थ्यांना लस देण्यास आली. यानंतर लसीकरणाची गती वाढवण्याचे शासनाने आदेश दिले. त्यानुसार मनपा प्रशासनाने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांपूर्वी लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर होता.

सध्या लसीकरणाला नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोरोना सौम्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दर आठवडयाला एक लाख लसींच्या साठयाची मागणी केली जात आहे. मात्र त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नाही.

सध्या आपल्याकडे ३० हजार लसींचा साठा आहे. आपण ५० हजार लसींची मागणी केली होती. मात्र पहिल्या टप्प्यात एवढ्याच लसी मिळाल्या आहेत. शासनाकडे अजून लसींची मागणी केलेली आहे. लवकरच लसींचा साठा मिळेल.
डॉ. उज्ज्वला भामरे, लसीकरण प्रमुख

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!