पिंपरी-चिंचवड : महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या दोन महापालिका म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
‘पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड मध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना सूचक इशारा देण्यासह महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आघाडीवरून सुरु असलेल्या वादावर देखील टिपण्णी केली.
‘आघाडी होईल की नाही या भानगडीत आपल्याला कशाला पडायचंय ? आपल्याला एकट्याने लढण्याची जास्त सवय आहे. आपण सगळ्या जागांवर लढू, बघू. युती झाली तर आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय. आपण रेंगाळत बसायचं नाही. सगळ्या जागांची तयारी करायची. नंतर ते आपल्या सोबत बसतील आणि जागांबद्दल प्रस्ताव देतील. सन्मानाने आघाडी करू पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही,’ असं रोखठोक भाष्य संजय राऊत यांनी आज केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मस्ती चढलेल्या आमदारावर गुन्हा दाखल करा, नाहीतर…; मनसेचा आक्रमक इशारा
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- ‘…तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- कोल्हापूरचे गडी पुण्यात आले, फक्त एकच सांगतो आमच्या अंगावर येऊ नका; राऊतांचा पाटलांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

