Share

आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रोष व्यक्त केला आहे.

आमदार सुनिल कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे, असं रुपाली चाकणकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

सुनिल कांबळे यांनी नालायकपणाच्या आणि बेशर्मीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ठेकेकारांनी न केलेल्या कामाची बील काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या कार्यकारी अभियंता या महिला अधिकाऱ्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या हे अतिशय संतापजनक आहे. पालिकेत आपली सत्ता आहे. आपण आमदार आहात आपल्या आमदारकीचा माज आपल्या घरी दाखवा सुनिल कांबळे पालिका कर्मचाऱ्यांवर नाही. पालिका कार्मचारी हे तुमचे नोकरी नाहीत ना ते तुमच्या पक्षाचे आहेत, असं म्हणत रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केल्याचे ऑडिओ क्लीपमधून समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!