पुणे : पुण्यातील भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यावर आता मनसेच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे शहरात विद्येच्या माहेरघरात जे संस्कृतीचा नेहमी टेंभा वाजवतात त्या नगरसेवक, आमदाराने वरिष्ठ महिला अधिकारी कर्मचारीला बील काढण्यासाठी अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. ही प्रवृत्ती कुठे चालली आहे, हे लोकप्रतिनिधी बघणार आहेत का नाही?, असा संतप्त सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला आहे.
एकीकडे महिला सुरक्षिततेचा, सक्षमतेचा नारा करताय, आंदोलने करताय आणि हेच लोकप्रतिनिधी कर्मचाऱ्यांना शिव्या देणार असतील तर अशा लोकप्रतिनिधींचं माननीय चित्राताई वाघ तुम्ही काय करणार?, असा सवाल रुपाली पाटलांनी भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना विचारला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ तुमच्या कर्मचाऱ्यांना अशी शिवीगाळ केली जाते. तो तुमचा नगरसेवक आहे. त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? दुसऱ्याच्या आईला घाणेरड्या भाषेत बोलताना हे लोकप्रतिनिधी आपल्या घरीही महिला आहेत हे विसरता का? आमदार सुनिल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर पुण्यातील महिला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा गंभीर इशाराही यावेळी रुपाली पाटील यांनी दिला आहे.
https://www.facebook.com/rupalipatilthombare/videos/183938037151113/
संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केल्याचे ऑडिओ क्लीपमधून समोर आलं आहे.
दरम्यान, एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या नावे बोंब मारत आहेत.भाजपच्या महिला आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधले होते. असे असताना दुसरीकडे भाजपचेच आमदार मात्र महिलांना अशा भाषेत बोलत असल्याचे प्रकरण समोर आल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. आता या प्रकरणी भाजपचे नेते आमदार कांबळे यांच्यावर काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचंच धोतर सुटलंय; चंद्रकांत पाटील राऊतांच्या निशाण्यावर
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला
- भाजप आमदाराची वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

