🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या दोन महापालिका म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
‘पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड मध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी तुफान टोलेबाजी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील त्यांनी लक्ष्य केलं.
‘कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात. ठिक आहे. घासून निवडून आले असतील. यावेळेला आपण महापालिकेत घासून का होईना पण ठासून निवडून येऊ. चंद्रकांत दादांना पुण्यात येऊ द्या. हा महाराष्ट्र आहे. कोल्हापूरचे गडी पुण्यात आले त्याचं वाईट वाटत नाही. फक्त आमच्या अंगावर येऊ नका. एवढंच आम्हाला सांगायचं आहे. कोणीही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका,’ असा थेट इशारा देखील राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मस्ती चढलेल्या आमदारावर गुन्हा दाखल करा, नाहीतर…; मनसेचा आक्रमक इशारा
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- ‘…तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
- ‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा-सोमय्यांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
