मुंबई : या महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. तर गेल्या दोन वर्षात निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला तडाखा बसला आहे. याचा सर्वाधिक फटका कोकण आणि गुजरातला बसला होता. आता आणखी देशावर आणखी एका चक्रीवादळाचं संकट राज्यावर घोंघावत आहे.
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी खोल दाबामध्ये वाढल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे.हवामान शास्त्रज्ञांच्या मते, गुलाब नावाचे हे चक्रीवादळ पुढील १२ तासात उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशावरुन जाऊ शकते.
या चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर देखील होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसह मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रादेशिक हवामान विभाग आयएमडी मुंबईच्या हवामान अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबासह राजस्थान आणि छत्तीसगडवर घोंघावत असलेल्या चक्रीवादळासारखी परिस्थिती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावरही परिणाम करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा परिणाम राज्यावर दिसून येईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत राहील.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मस्ती चढलेल्या आमदारावर गुन्हा दाखल करा, नाहीतर…; मनसेचा आक्रमक इशारा
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- ‘…तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
- ‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल
- कोल्हापूरचे गडी पुण्यात आले, फक्त एकच सांगतो आमच्या अंगावर येऊ नका; राऊतांचा पाटलांवर निशाणा


