Share

‘…तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी

Published On: 

पुणे : येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष युती आणि स्वबळ याबाबत वेगवेगळी भूमिका घेत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत.

आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या दोन महापालिका म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड मध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी तुफान टोलेबाजी केली.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत देखील एक मिश्किल विधान केलं आहे. ‘मी अनेक वर्ष दिल्लीत राहतो, सफदरजंग लेनला राहतो.दिल्लीतील सर्वात प्रथितयश भाग आहे तो, शिवाजीराव आढळराव पाटील यांना माहिती आहे. मी माझा पत्ता सांगताना काय सांगतो नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात. रस्ता ओलांडला की समोर ते राहतात, ही शिवसेनेची कृपा आहे. देशाची राजधानी इतकी मोठी तिथं लोकं आपल्यालाला ओळखतात. मी सांगतो नरेंद्र मोदी माझ्यासमोर राहतात, जर तुम्ही त्यांना विचारलं कुठे राहता ? तर ते ही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोर राहतात,’ असं मिश्किल भाष्य संजय राऊत यांनी केला. यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!