Share

‘शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही’

Published On: 

नवी दिल्ली : राज्यात सध्या शिवसेना युपीएत जाणार का याबाबत राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. शिवेसेनेचे खासदार संजय राऊत हे आज दिल्लीत भेट घेण्यावरुनही राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट यावर भाष्य केले आहे.

राहुल गांधी यांच्याशी माझी भेट कायम होत असते. महाराष्ट्रातील घडामोडींसदर्भात राहुल गांधी अनेकदा माझ्याकडून माहिती घेत असतात. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडींसदर्भात आज पहिल्यांदाच मी भेटत आहे. त्यांना भेटण्यात काहीच हरकत नाही. त्या काँग्रेस नेत्या, महासचिव आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मी पक्षाचा शिवसैनिक आहे. त्यामुळे आम्ही जे काही करतो ते त्यांच्या सूचनेनुसारच करत असतो. राजकारणात ज्या काही घडामोडी घडतात त्याची कल्पना आम्ही पक्षप्रमुखांना देत असतो. उद्व ठाकरेंचे काय म्हणणे आहे ते योग्य वेळी सांगतिल, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक आहेत, असही राऊत म्हणाले. राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असं नाही. शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा देखील हा विषय समोर आला होता.देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!