Share

हेच का तुमचे संस्कार?; शाळेवर हल्लाप्रकरणी जितेंद्र आव्हाड संतप्त

Published On: 

मुंबई : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशातील एका कॅथलिक शाळेवर सोमवारी हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जाऊ लागला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत लिहिले की, ‘व्हिडिओमधे शाळेवर हल्ला करण्यात येत आहे ती मध्यप्रदेश राज्यातील शाळा आहे. जरी ती शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी तिथले बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक गण हिंदूच आहे एवढे सुद्धा कळत नाही का? अशा प्रकारे हल्ला करून लहानग्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? हेच आहेत का तुमचे संस्कार?,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

या शाळेत विद्यार्थ्यांचं धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप करत ही दगडफेक करण्यात आली आहे. ज्यावेळी ही दगडफेक करण्यात आली त्यावेळी आतमध्ये विद्यार्थी परीक्षा देत होते. त्यामुळे अनेक लोक याप्रकरणी संतप्त झाले आहे. मध्यप्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या गंज बसोडा इथल्या सेंट जोसेफ शाळेत हा प्रकार घडला.

यावेळी या जमावाने  आक्रमक भूमिका घेत शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. तसेच घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!