मुंबई : सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिला होता. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अजित पवारांवर निशाना साधला आहे.
याबाबत सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले आहे. खोत म्हणतात, सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका- अजितदादा पवार यांचा शेतकऱ्यांना सल्ला. कारण राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना दिला आहे. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका – अजितदादा पवार यांचा शेतकऱ्यांना सल्ला
कारण राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 8, 2021
अजित पवार म्हणाले होते, रस्ता रुंदीकरणामध्ये लोकांनी रस्त्याच्या बाजूला झाडं लावलीत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावली नसल्याचे दिसून आले. यावर प्रांतधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना सल्ला दिला.
महत्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- ‘नागालँड प्रकरणाची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ कधी होणार?’, खा. राऊतांचा सवाल
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- ईडी चौकशीनंतर राज्यमंत्री तनपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
- ठाकरे सरकार अडचणीत; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी


