Share

‘उध्दव ठाकरेंचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यावर टीका

Published On: 

सोलापूर : राज्यात सध्या शिवसेना युपीएत जाणार का याबाबत राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. शिवेसेनेचे खासदार संजय राऊत हे आज दिल्लीत भेट घेण्यावरुनही राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगत आहेत. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर आगपखाड केली आहे.

शिवसेनेचा केंद्र बिंदू हा काँग्रेस झाला आहे. त्यामुळे शिवसेना आता काँग्रेस भोवती पिंगा घालताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना यापूर्वी काँग्रेसमध्ये गेली त्यामुळे आता युपीएमध्ये गेली तर काय विशेष बाब नाही, अशी खोचक टीका प्रविण दरेकरांनी केली आहे.

सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण दरेकरांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. प्रविण दरेकर सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न, बंद असलेली विकासकामे आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य केले आहे.

मागील सरकारच्या काळात भाजपसोबत सत्तेत शिवसेना असताना उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी मदत करण्याची मागणी केली होती. मात्र आता ते स्वत: मुख्यमंत्री असताना त्यांनी 10 हजार सुद्धा दिले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे शेतकरी प्रेम हे पुतणा आणि मावशीचे प्रेम ठरले आहे, असा टोला प्रविण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!