नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा (New Zealand Cricket Team) दिग्गज फिरकी गोलंदाज एजाज पटेल (Ajaz Patel) याने आयपीएल (IPL) मध्ये खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला संधी मिळाल्यास जगातील या सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये खेळायला नक्कीच आवडेल, असे म्हटले आहे.
एजाज पटेलने मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शानदार गोलंदाजी करताना टीम इंडियाच्या डावातील सर्व 10 बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एजाज पटेलने 12 मेडन्समध्ये 47.5 षटकात 119 धावा देत 10 बळी घेतले.
एजाज पटेलच्या या जबरदस्त कामगिरीनंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आयपीएलच्या पुढील मोसमासाठी लवकरच लिलाव होणार आहे आणि अशा परिस्थितीत अनेक फ्रँचायझींच्या नजरा एजाज पटेलकडे असतील. त्याचबरोबर एजाज पटेलनेही आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला, ‘मला संधी मिळाली तर मला भारतात आयपीएल खेळायला नक्कीच आवडेल. ही एक उत्तम स्पर्धा आहे. जगभरातील चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करतो. ही एक उत्तम स्पर्धा आहे आणि मला संधी मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. त्याचवेळी एजाज पटेलने आपल्या कसोटी कारकिर्दीबद्दल आणखी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, माझ्या कारकिर्दीवर नजर टाकली तर मी 11 सामने खेळले आहेत. मला न्यूझीलंडसाठी 80-90 सामने खेळणाऱ्यांपैकी एक व्हायचे आहे आणि त्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतील आणि माझ्या खेळात सुधारणा करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
- अॅशेस मालिका सुरू होण्यापूर्वी बेन स्टोक्सने वडिलांच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट
- एसटी संप, ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अजिंक्य रहाणे असणार उपकर्णधार?


