🕒 1 min read
मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त काल (२३ जानेवारी) उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा जोरदार समाचार घेतला होता. “शिवसेना जन्माला येण्यापूर्वीच मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. १९८४ मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते”, असे फडणवीस म्हणाले होते. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “भाजपच्या जन्म तारखेचा दाखला देवेंद्र फडणवीसांनी आणावा. जनता पक्षाचे पतन झाल्यावर १९८० च्या दशकात भाजपचा जन्म झाला आहे. तर शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला. शिवसेनेचा पहीले महापौर मुंबईमध्ये डॉ हेमचंद्र गुप्ते हे कधी झाले. त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते. या संदर्भातील एक अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठाणमध्ये ठेऊ. कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते येऊ शकतात. शिवसेनेते पहिले आमदार वामनरान महाडिक देखील त्याच काळात निवडणून आले. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी, महाराष्ट्राच्या राजकारणाशी सबंध नसेल कारण या सर्व गोष्टी फडणवीस यांच्या जन्माआधीच्या आहेत.”
बाळासाहेब ठाकरेंची साक्ष
राम जन्मभूमी आंदोलनामध्ये फक्त भाजपचा सहभाग होता शिवसेनेचा नव्हता, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “कोणी काहीही म्हटलं तरी इतिहास आहे, दस्ताऐवज आहे. साक्षी पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना त्यामध्ये गुन्हेगार केलं होतं. शेकडो कारसेवक मुंबईतून गेले. त्याला कोणताही राजकीय पक्ष त्यावेळी नव्हता. त्या काळातला सामना पाहिला तर कारसेवकांची यादी आम्ही दिली आहे.”
औरंगजेबाला कवटाळून बसला होता का?
आम्ही प्रयागराज नाव आम्ही करुन दाखवल उस्मानाबाद, औरंगाबदच काय?, फडणवीसांच्या या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? एखाद्या शहराचे नाव बदलायचं असेल तर केंद्र सरकारची परवाणगी लागते. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे पण केंद्राने याला का मंजूरी दिली नाही. हे विचारावं लागेल. जसं योगींनी प्रयागराज करून घेतले तसे देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादच संभाजीनगर का करुन घेतलं नाही?, हा मोठा प्रश्न आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; धनंजय मुंडे म्हणाले, “फिर भी आपको लढना है, क्योंकी..”
- संत एकनाथ रंग मंदिराच्या खाजगीकरणावरून ‘मनसे’ आक्रमक; महापालिकेविरोधात आंदोलन..!
- ‘हाऊज द जोश’ म्हणत प्रसिध्द झालेल्या विकी कौशलच्या ‘या’ नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल
- “बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार”, महावितरणच्या थकबाकीवरून भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
