मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेनंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील पत्रकार परिषद घेत राऊतांवर टीका केली.
सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. १९ बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो, असं सोमय्या म्हणाले.
यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, अलिबागमधले १९ बंगले कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे, हा माझा प्रश्न आहे. अर्जुन खोतकरांना त्रास का दिला जातोय, हा माझा प्रश्न आहे. भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा गुन्हा काय?, हा माझा प्रश्न आहे. अमोल काळे कुठेय? काय व्यवहार आहे हा? याची उत्तरं द्या, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मेगा ऑक्शनमध्ये मोठी गडबड बोली मुंबईची पण खेळाडू दिल्लीला दिला
“बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!”; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

