Share

“बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!”; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

Published On: 

मुंबई : सध्या राज्यात आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला मिळत आहे. काल (मंगळवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या आरोपांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबावर व संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान आता शिवसेना देखील मैदानात उतरली असून राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद आयोजित करून संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) तसेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर देखील आरोप केले आहेत. यानंतर संजय राऊत यांनी देखील आपल्या शैलित सोमय्यांना इशारा दिला आहे. “बाप बेटे जेल मधे जाणार ! Wait and watch ! कोठडीचे sanitization सुरू आहे…जय महाराष्ट्र !”, असे संजय राऊत म्हणाले.

सोमय्यांचा रश्मी ठाकरेंवर आरोप

किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरली. त्याचं ५.४२ लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. २००८ मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट २०१४ मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हे २०२० ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केला. शिवाय मी १२ महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले, असा आरोपही सोमय्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!