Share

किरीट सोमय्या म्हणाले; ‘मला जोड्यानं मारताय, मारा, पण…’

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेनंतर आता भाजप नेत्यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. तसेच उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर देखील प्रॉपर्टी टॅक्सवरुन सोमय्या यांनी आरोप केले आहेत.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. १९ बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!