बंगळुरु : आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनने चाहत्यांचे लक्ष विविध मार्गांनी वेधून घेतले. ज्यामध्ये काही अनपेक्षित खेळाडूंवरही मोठी रक्कम उधळली गेली. तर दुसरीकडे, काही मोठी नावे अनसोल्ड राहिली आहेत. यात संघानी खेळाडू खरेदी करताना अनेक डावपेच रचले. मात्र आता मेगा ऑक्शन संपल्यानंतर तेव्हा ऑक्शनर चारू शर्माकडून झालेल्या एका मोठ्या गडबडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एका बोली दरम्यान, दिल्लीचे सहमालक किरण कुमार यांच्यामुळे गडबड झाली. ऑक्शनर चारू यांनी वेगवान गोलंदाज खलील अहमदचे नाव सांगितले आणि मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम ५. २५ कोटींची बोली लावली परंतु किरण यांनी ५.५ कोटींसाठी पॅडल उभारले आणि शर्माला वाटले की ही दिल्ली कॅपिटल्सची पहिली बोली आहे. जेव्हा किरण यांनी बोली लावल्यावर थांबायला सांगितले आणि गोंधळ अजून वाढला ज्यात शर्माने खलील अहमदला दिल्लीला केवळ ५. २५ कोटींमध्ये विकले. खलीलच्या त्या बोलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Ashok94540994/status/1493468713399758848?s=20&t=CEbSEs-a68IQSN0baQ35Tw
दिल्लीचे सहमालक यांनी ऑक्शनमध्ये अनेक डावपेच रचले. त्यांनी अनेक खेळाडूंच्या किंमती वाढवून दिल्या. त्याचेही कौतुक नेटकरी करत आहेत. ऑक्शनर चारू शर्मा यांना ऑक्शनर ह्यू एडमिड्स यांची तब्येत बिघडल्याने अचानक ऑक्शनर म्हणून बोलवण्यात आले होते. कोणतीही पूर्व तयारी किंवा पूर्व सूचना न देताही चारू शर्मा यांनी भूमिका पार पाडली. मात्र आता मुंबईने बोली लावलेला खलीला एका घोट्याळ्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांनी केला रश्मी ठाकरेंवर आरोप; म्हणाले…
- “मी त्याच्या मोठ्या भावासारखा होतो…” चेन्नईतून बाहेर पडल्यानंतर फाफ डु प्लेसिसचे खेळाडूसाठी भावनिक वक्तव्य
- बॉलिवूडचा ‘गोल्डन’ आवाज हरवला; बप्पी लहिरी यांचे निधन
- ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर श्रीशांतची भावनिक पोस्ट म्हणाला..
- ‘कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत’ – किरीट सोमय्या


