Share

किरीट सोमय्यांनी केला रश्मी ठाकरेंवर आरोप; म्हणाले…

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेनंतर आता भाजप नेत्यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद आयोजित करून संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) तसेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरलीय. त्याचं ५.४२ लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. २००८ मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट २०१४ मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हे २०२० ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी १२ महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले, असा आरोपही सोमय्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!