🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधीत दर कमी होण्याच्या दृष्टीने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यादुष्टीने व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रीयपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण कमी करून शहराप्रमाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागही स्तर एक मध्ये आणण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सूचित केले.
गावामध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, धार्मिक विधी करणारे यासह सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवावे. जेणेकरून ग्रामीणचा बाधित दर कमी होण्यास मदत होईल. ‘ब्रेक द चेन’च्या या टप्प्यात शाळा, महाविद्यालय, धार्मिक, पर्यटन स्थळाव्यतीरिक्त सर्व बाबी खुल्या करण्यात आल्या आहेत. बाजारपेठ सुरू करण्यास आता परवानगी देण्यात आली असून गर्दीचे प्रमाण यामुळे वाढणार आहे. त्यातून निर्माण होणारा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी सर्व दुकाने, व्यापारी, व्हॉटेल, सर्व व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या मालक, कर्मचारी या सर्वांचे कोविड चाचणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुदतीनंतरही चाचणी न करता दुकान सुरू ठेवणाऱ्यांची दुकाने सील करण्यात येतील. त्याबाबत पूर्व कल्पना द्यावी. शंभर टक्के चाचणी करणाऱ्या व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांचा गौरव करावा. नाविण्यूपूर्ण उपक्रम राबवून ग्रामीण भागामध्ये चाचणी मोहिम ही लोकचळवळीच्या स्वरुपात यशस्वी रित्या राबवावी. जेणेकरुन लवकरच औरंगाबाद शहराप्रमाणे औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याही स्तर तीन मधून लेवल एक मध्ये आणता येईल, या उद्देशाने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वायतून उल्लेखणीय काम करावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ व्हिडीओचा सो कॉल्ड राड्याशी संबंध नाही; मनसे नेत्याने उडवली शिवसेना-भाजपची खिल्ली
- कोरोना काळात स्टील कंपनीला ऑक्सिजन देणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘बाबरप्रेमी पप्पू व पप्पूच्या मम्मीला खूश करण्यासाठी मंदिर उभारणीची बदनामी’
- पर्यटन स्थळे सुरू मात्र, व्यावसायिकांना आरटीपीसीआर बंधनकारक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
