🕒 1 min read
मुंबई : आम आदमीच्या नेत्याने अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंड खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर काँग्रेससह शिवसेनेनं या प्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील टीका करण्यात आल्यांनतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला.
भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाल्याचं पाहायला मिळालं.
https://www.facebook.com/sandeepDadarMNS/videos/186879370027087/
या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांना इशारे देत असून भाजप नेत्यांनी पोलीस स्टेशन गाठून शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व वादावर मनसेने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत ‘या व्हिडीओचा सो कॉल्ड राड्याशी संबंध नाही’ असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ गोलमाल-३ या चित्रपटातील असून संदीप देशपांडे यांची ही पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसची असेल तर शिवसेनेचीही स्वबळाची तयारी’, मंत्री अब्दूल सत्तार यांचा निर्धार
- नियमावलीवरून मोदी सरकारशी पंगा घेणाऱ्या ट्विटरविरोधात पहिला गुन्हा युपीत दाखल
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘बाबरप्रेमी पप्पू व पप्पूच्या मम्मीला खूश करण्यासाठी मंदिर उभारणीची बदनामी’
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
