पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. १४ जून रोजी १८८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यानंतर या आकड्यात काल वाढ झाली. १५ जून रोजी २४६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद केली गेली. तर, रुग्णवाढीचा आलेख आजही(दि. १६ जून) चढताच असून २९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील ३२१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६३ हजार ६०१ झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या(ऍक्टिव्ह रुग्ण) २ हजार ७३८ रुग्णांपैकी ४५१ रुग्ण गंभीर तर ७०३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ व्हिडीओचा सो कॉल्ड राड्याशी संबंध नाही; मनसे नेत्याने उडवली शिवसेना-भाजपची खिल्ली
- कोरोना काळात स्टील कंपनीला ऑक्सिजन देणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘बाबरप्रेमी पप्पू व पप्पूच्या मम्मीला खूश करण्यासाठी मंदिर उभारणीची बदनामी’
- पर्यटन स्थळे सुरू मात्र, व्यावसायिकांना आरटीपीसीआर बंधनकारक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

