Share

Lip Care Tips | हिवाळ्यामध्ये ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या ओठांची काळजी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) वाढत्या थंडीनुसार ओठ (Lip) फाटण्याची समस्या सामान्य होत जाते. हिवाळ्यामध्ये फाटलेल्या ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी दिसायला लागते. त्याचबरोबर थंडीमुळे ओठांच्या त्वचा कोरडी व्हायला लागते. ओठांवर मॉइश्चरायझर नसल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे हिवाळ्यात निरोगी ओठांसाठी आपण अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरत असतो. पण अनेकदा हे केमिकल युक्त प्रोडक्ट आपल्या ओठांवर दुष्परिणाम दाखवतात. त्यामुळे ओठांचे सौंदर्य नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठी आम्ही आज तुम्हाला काही घरगुती पद्धती सांगणार आहोत. खालील पद्धती फॉलो करून हिवाळ्यामध्ये ओठांची काळजी घ्या.

गुलाबाच्या पाकळ्या

या कडाक्याच्या हिवाळ्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या ओठांना गुलाबी आणि मुलायम बनवतील. यासाठी तुम्हाला 7-8 गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर दुधात भिजवून ठेवाव्या लागतील. सकाळी हे दूध गाळून त्यातील पाने मॅश करून पेस्ट तयार करून घ्या. तयार झालेली ही पेस्ट पाच ते दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने ओठ धुवा. नियमित या पद्धतीचा वापर केल्याने तुमचे ओठ मुलायम आणि गुलाबी दिसायला लागतील.

खोबरेल तेल

खोबरेल तेल आपल्या शरीरासाठी, केसांसाठी त्याचबरोबर ओठांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. खोबरेल तेल ओठांना मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित खोबरेल तेल ओठांना लावल्याने ओठांवरील काळेपणा देखील दूर होऊ शकते. हिवाळ्यामध्ये ओठांना खोबरेल तेल लावल्यास फाटलेल्या ओठांची समस्या देखील दूर होऊ शकते.

मध

ओठांना मऊ आणि नैसर्गिकरित्या गुलाबी बनवण्यासाठी मध मदत करते. हिवाळ्यामध्ये तुम्ही जर ओठ फाटण्याच्या समस्येला झुंज देत असाल, तर मध तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. नियमित ओठांना मध लावल्याने फाटलेल्या ओठांची समस्या दूर होऊन तुमचे ओठ गुलाबी दिसायला लागतील.

बदाम तेल

बदाम तेल ओठांसाठी खूप फायदेशीर आहे. बदाम तेलाने ओठ मॉइश्चराइज राहण्याबरोबरच ओठांचा काळेपणाही दूर होतो. त्याचबरोबर नियमित ओठांना बदाम तेल लावल्याने होत गुलाबी देखील होऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बदाम तेलामध्ये काही थेंब लिंबाचे रस मिक्स करावे लागेल. हे मिश्रण ओठांवर लावल्यावर थोड्यावेळाने सामान्य पाण्याने त्याला धुवा.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!