🕒 1 min read
IPL 2023 | Dwayne Bravo : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी डिसेंबर महिन्यात 23 तारखेला कोची येथे आयपीएलसाठी लिलाव होणार आहे. लिलावापूर्वीच सर्व फ्रेंचाईजींनी आपल्या रिटर्न आणि रिटर्न खेळाडूंची नावं जाहीर केली आहे. यादरम्यान आपल्याला सर्वच संघामध्ये थोडे बदल बघायला मिळाले आहे. अशात सीएसके संघाने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी पुढील हंगामात संघामध्ये नसल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग संघातील अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) ने निवृत्ती जाहीर केली आहे. ब्रावोने निवृत्ती जाहीर करताच संघाने त्याला या हंगामासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सने एका निवेदनात म्हटले आहे की,”पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी ब्रावो संघाचा गोलंदाजी प्रशिक्षण म्हणून काम करेल. तर लक्ष्मीपती बालाजी वैयक्तिक वचनबद्धतेमुळे आयपीएलच्या पुढच्या हंगामामध्ये ब्रेक घेत आहे. मात्र, ते सीएसके अकॅडमीसाठी उपलब्ध असतील.”
सीएसके संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाल्यावर ब्रावो आनंद व्यक्त करत म्हणाला की,”मी याच क्षणाची वाट पाहत होतो. कारण मी माझ्या क्रिकेट करिअरनंतर असे काहीतरी शोधत होतो की मला गोलंदाजी पासून लांब जाता येणार नाही. मला गोलंदाजी सोबत काम करायला मजा येते या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. ही नवी भूमिका साकारताना मला फारसे बदल करण्याची गरज वाटत नाही. कारण खेळाडूपासून प्रशिक्षकापर्यंत ते गोलंदाजासोबत काम करत असताना मी नेहमी एक पाऊल पुढे राहून योजना आणि कल्पना मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता फक्त एवढाच फरक राहील की मी यापुढे मिड-ऑन किंवा मिड-ऑफ उभा राहू शकणार नाही.
ब्रावो आयपीएल मधील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये 161 सामन्यांमध्ये तब्बल 183 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर या अष्टपैलू खेळाडूंनी जवळपास 130 च्या स्ट्राईक रेटने 1560 धावा देखील केले आहेत. आयपीएलच्या पहिल्या तीन हंगामामध्ये ब्रावो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. त्यानंतर 2011 पासून ब्रावो चेन्नई सुपर किंग्स अविभाज्य भाग बनला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Zika Virus | पुण्यात सापडला झिका व्हायरसचा रुग्ण, प्रकृती उत्तम असल्याची मिळाली माहिती
- Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबीन नौटियालने शेअर केली हेल्थ अपडेट, म्हणाला…
- Chennai Super Kings | धोनीनंतर कोण सांभाळणार चेन्नई सुपर किंग्स?, CSK च्या प्रशिक्षकांनी दिली माहिती
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये का करावे अंड्याचे सेवन?, जाणून घ्या
- Maharashtra Winter Update | तापमानाचा पारा 9.5 अंशावर, तर राज्यात यंदा अजून थंडी वाढणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
