🕒 1 min read
MNS Gajanan Kale | मुंबई : तुरुंगातून सुटल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. सुषमा अंधारे यांनी मुलुंड येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला रोखठोक प्रत्युत्तर दिलं होतं. यावर मनसे नेते गजानन काळे यांनी जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी घणाघात केला.
“वक्तृत्व स्पर्धेत टाळया आणि बक्षीसं मिळावीत म्हणून ‘मनी म्याव’ कायम भाषणं करत आली आणि त्याच सवयीचा गुलाम झाल्यामुळे वेडेवाकडे चाळे करत आता राजकारणात टिकू पाहतेय. उष्माघाताने राहिलेली शिल्लकसेना पण जिवंत राहते की नाही या चिंतेत मातोश्री वरचा ‘सोंगाड्या’ आणि सैनिक असल्याचं कळतंय,” असे ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे.
“महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक ‘सोंगाड्या’ आहे जो सकाळी भगवा,दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो. तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचे जास्त पडलंय. वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की ‘गुळाची ढेप’ मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको”, असे देखील गजानन काळे म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे –
“आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी… असा त्यांचा कार्यक्रम असतोय.. याला थोडं बोलेन.. त्याला थोडं बोलेन.. काही वेळासाठी विचारवंत होईल.. मध्येच मिमिक्री कलाकार होईल… असा त्यांचा कार्यक्रम असतो…” असे वार अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Weight Loss Tips | डायटिंग आणि व्यायाम न करता ‘या’ टिप्स वापरून करा कमी वजन
- IPL 2023 | आयपीएलमधून संन्यास घेताच, CSK ने सोपवली ब्रावोवर ‘ही’ मोठी जबाबदारी
- Zika Virus | पुण्यात सापडला झिका व्हायरसचा रुग्ण, प्रकृती उत्तम असल्याची मिळाली माहिती
- Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबीन नौटियालने शेअर केली हेल्थ अपडेट, म्हणाला…
- Chennai Super Kings | धोनीनंतर कोण सांभाळणार चेन्नई सुपर किंग्स?, CSK च्या प्रशिक्षकांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
