औरंगाबाद : स्व. गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांनी आपल्याला गरिबांची सेवा करण्याचा वारसा दिला आहे. तो आपण गावागावापर्यंत पोहोचवायला हवा. गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत ही या सेवेचा वारसा आपण पोहोचवू. वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार या सर्वांपर्यंत गोपीनाथ गड गेला पाहिजे. असा संकल्प आज करा असे आवाहन पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी गोपीनाथ गडावरुन केले. भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीड मधील गोपीनाथ गड या ठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प केला. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसावरून धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावला. परळीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. मात्र, आपली जयंती ही लोकांच्या सेवेसाठी आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचला पाहिजे. त्यासाठी आज संकल्प करीत आहोत. गोपीनाथ मुंडे यांची जयंती सेवेसाठी समर्पीत आहे, असे मुंडे यांनी म्हटले.
गरीबांचा राजा जन्मला
पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. गोपीनाथ मुंडे जन्मले तो दिवस नेमका कसा होता याबाबत त्यांच्या आजी म्हणत, त्यादिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. गरिबांचे काम करणारा राजा या दिवशी जन्मला. त्यामुळेच तर लोक पोवाडे, भारुडाच्या माध्यमातून त्यांचे गुणगान गातात.
महत्त्वाच्या बातम्या
- …असाच चमत्कार २०२४ नंतर दिल्लीत घडवला पाहिजे- छगन भुजबळ
- शिवसेनेने स्वतःचे घर किती गळके आहे ते पाहावे, हा डोलारा लवकरच कोसळेल- मनसे
- ‘मर्यादित षटकांमध्ये भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात’
- शरद पवार म्हणाले, कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी..
- ‘रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

